होळी – २०२४
मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी, हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. होळीच्या दिवशी होलीका दहन करतात आणि पुरणाचा नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून अग्नि देवतेला नमस्कार केला जातो.
हे पण राक्षसी होलिकेचच दहन असतं. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. हे जरी खरे असले, तरी आपण जी होळी साजरी करतो ती असतं नसून सत होळी होय.
यामध्ये आपण होलीका दहन करण्यापूर्वी स्नान करून शुध्द अंतःकरणाने, शुध्द भावनेने, शुध्द चित्ताने या पवित्र अग्निला साक्ष ठेऊन आपल्यातील अवगुणांना तिलांजली देण्याचे कार्य करायचे असते आणि येणारे वर्ष सुख, समृध्दीने, आरोग्यदायी, मंगलमय, आनंददायी जाण्यासाठी त्या आपल्या सत्याकडे मागणे मागावं यांचे असते.
हा दिन म्हणजे सताचा असतावर विजयोत्सव असतो. या सणाच्या निरनिराळ्या आख्यायिका आहेत, त्यामध्ये न जाता…….आपण होळीच्या या पवित्र अग्निमध्ये सर्वस्व असत गोष्टिंचा स्वाहा:कार करून आयुष्यातील नविन पर्वाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावयास हवे…..
होळीच्या या पवित्र सणामध्ये सर्वसामान्यतः माणूस अघोरी कृत्यांचा सहारा घेऊन वाईट कुकर्मे करण्याचा प्रयत्न करतो…..पण आपण सन्मार्गी माणसांनी अशी कृत्ये टाळून, सन्मार्गाने जाऊन, या पवित्र अग्निच्या सहाय्याने पवित्र कर्तव्यें पार पाडण्याचा मानस उद्घोषित करून, सत् मार्गावर चालण्याचा मनोदय व्यक्त करून, पुढील काळात तसे वागण्याचा निश्चय करून मार्गस्थ व्हावयाचे असते……..हिच खरी आपली होळी………!!!
कालच्या या होळीची कांही क्षणचित्रे येथे व्हिडीयोच्या माध्यमातून आपणांपर्यंत घेऊन आलो आहोत………©️