आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन केले आहे, सांगितले आहे. शाप संपूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यातून मुक्तता झालेली नाही. उ:शाप दिलेला होता तो संपूर्ण नव्हे, पण संपत आलेला आहे. तो संपल्यानंतर भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ही महाराष्ट्र भूमी चमकेल. महाराष्ट्र भूमीच्या उद्धारासाठी हे अवतारकार्य महाराष्ट्रात नटवले आहे.
या आसनाचे ठिकाणी अनेक तऱ्हा नटवल्या आहेत. ही भूमी शाप मुक्त करण्यासाठी, अनेक अवतारकार्ये नटवली आहेत, संत निर्मिती केली. तो काळ समीप आला आहे.
या ठिकाणी या भूमीत अघोरांनी धुमाकूळ घातला. ऋषिकुळे गायब केली. त्यांना मुक्त करण्याचे कर्तव्य या आसनाने पार पडले. त्याचाच हा आनंद आहे. ज्यावेळी संपूर्ण शाप मुक्तता होईल, मग संघर्षण अजिबात राहणार नाही.
या आसनाला चकविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे, पण आसन चकलेले नाही. याचे चक्षुतून काही एक सुटणार नाही, सुटले नाही व सुटू शकणार नाही. आज जरी संघर्षण असले तरी उद्या आनंद होणार आहे. त्यासाठी या आसनाने कर्तव्य शिरावर घेतले आहे. आपण एकमेकांचे सानिध्यात राहून कर्तव्य पार पाडलेले आहे. महान महान असुरांशी संघर्षण करून कित्येक चमत्कारिक कृत्ये उजेडात आणलेली आहेत, त्याचे कारण एकच, सेवेकऱ्यांना दाखवण्यासाठी. ©️
