श्री समर्थ मालिक – या आसनाच्या सेवेकऱ्यांना अनेक वेळेला टोचणी दिलेली आहे. सर्व सेवेकऱ्यांची मनोभावना शुद्ध आहे का असे देखील विचारले.
आसनाधिस्त गावाला जाऊन किती दिवस झाले? आदीअंता पासून ते आहेत.
काही गुप्त गोष्टी गुप्त असतात. सत् त्या गोष्टी गुप्त ठेवतात.
अर्जुनाला देखील सांगितले होते, “सत् असताचा वाद विवाद चाललेला आहे. याच्यासाठी कोणत्याही सेवेकऱ्यांनी, “बस, गती घे !” मला सांगा, असे विचारणे योग्य आहे का? जरी सेवेकर्याला सांगितले, तरी सांगून काय उपयोग आहे?
अजून शुद्ध व्हा ! शुद्ध गतीने जा ! मनाची शुद्धता ठेवा ! “बस, गती घे आणि काय आहे ते सांग” हे म्हणने योग्य आहे का?
भक्ती जितकी साधी, तितकीच कठीण आहे. म्हणून सोप्या सुलभ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. साधी सोपी भक्ती म्हणजे सरळ शुद्ध मार्गाने गेला तर कठीण आहे नाही का? ©️
