Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबारच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी मला कोण बोलणार आहे?

येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे, तो कोठेही असो, त्या सेवेकऱ्यास भीती नाही. जे सेवेकरी कर्तव्यासाठी ठाम आहेत, त्यांच्याकडून कर्तव्य करून घेतली जातात वा कर्तव्य करून घ्यावयाचे आहे. कर्तव्यात कसर नको. संशयातीत सेवेकरी येथे असतात त्यांच्या मनाच्या आत कोण आहे? त्यांच्या मनात संशय असल्यामुळे सेवेकरी घाबरतात. ते अजून बाकी आहेत.

येथूनच सर्वस्व घडत असते. सर्वस्व प्रकाशित ज्योती आहेत पण कशापासून असे होत असते? आपण एवढे सांगत असता, किती वर्षे इथे आहात, मग यांनी गती घेतली का की आसनावर काय चालते म्हणून? तुम्हीच पहा आणि सांगा. सर्वस्व मी बोलत असतो.

कृती कृती म्हणजे काय? नामस्मरण होत नाही कारण बसणार कुठे? त्यासाठी बसावयास लागतेच असे नाही.

तत्व – त्यामध्ये रममाण होणे गरजेचे आहे. तत्व सोडून ज्ञानी होता येईल का? तत्त्व न सांभाळल्यामुळे ठाम कसे होता येईल? आपली चार तत्वे प्रमुख आहेत – ज्याला ती ज्ञात आहेत, तो माझ्यापर्यंत येत असतो. त्याची ही दृष्टी सर्वत्र सत् सगुण सामावलेली असते. मी कोठे दूर नाही. मी प्रत्येकात रममाण होतो. प्रत्येक ज्योतीत रममाण होणारे हे तत्व आहे. प्रत्यक्षात मानव निवेदन देतो. त्यांची निवेदन मी ऐकत असतो. तो प्रणव टाकत असतो त्याप्रमाणे खरोखर झाला आहे काय? तो कित्येक कर्तव्ये करीत आला असता, पण मनामध्ये विचार आहेत. त्यामुळे निवेदन करीत असतो. त्याच्या मनातच काहीतरी आहे. ©️

You cannot copy content of this page