श्री समर्थ रामदास स्वामी –
हरिहर ब्रह्मादिक | नाश पावती सकळीक ||
सर्वदा अविनाशी एक | सद्गुरु पद ||
ह्या परम श्रेष्ठ पदाचा महिमा माझ्या सारख्या यत् किंचित पामराने कोठवर वर्णन करावा? अविनाशी पद काय आहे? त्याचा कधीही विनाश होत नाही. कोणी करणारा नाही. करविता नाही. केलेला नाही. अशा परम पदाचा महिमा माझ्या सारख्या यत् किंचित पामराने कोठवर वर्णन करावा? त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी अनेक योगी, ॠषी, मुनी अनंत काळ ध्यानमग्न होऊन बसले आहेत. त्यानांही थांगपत्ता लागलेला नाही.
श्रृती, स्मृती, वेद पुराणे नेती नेती म्हणून थकून गेली आहेत. मी माझ्या अल्प बुध्दी प्रमाणे वर्णन केले आहे.
हरिहर आणि ब्रह्म हे अशाश्वत आहेत. म्हणजेच नाश पावणारे आहेत. या तत्वांपेक्षा सत् हे तत्व अत्यंत श्रेष्ठ आहे. याच तत्वामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतात. हे चक्र अहोरात्र सतत चालू आहे. याचमुळे या तिन्ही तत्वांची ही संघटना एके ठिकाणी होऊन त्या सर्वांवर श्रेष्ठ असे जे पद तेच अविनाशी होय. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही तत्वे ज्या ठिकाणी विलीन झाली आहेत, असे जे श्रेष्ठ पद तेच अविनाशी होय. त्या दिवशी अखंड तत्व प्रगट होते, त्यामुळे दर्शनाची तन्मयता लागली होती. तस्मात् सेवेकऱ्यास एकचित्तता साधता आली नाही. यामुळे असे झाले. ©️
(समाप्त)