श्री समर्थ मालिक – सेवेकरी चकतो का? कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते त्याच्यावर सेवेकऱ्याने बाहेर वाच्यता न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो.
खरोखरच येथील सेवेकऱ्यां जवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी उभे असताना, त्या सेवेकऱ्यांनी हातात माती जरी घेतली, तर त्या मातीचे सोने करण्याची कुवत असते, पण ही पात्रता ज्याची त्याने राखावयाची असते. कोणत्याही ठिकाणी सेवेकरी जावो, जर अडी अडचणी आल्या तर काळ सुद्धा त्या ठिकाणी फिरकत नाही.
प्रत्येक सेवेकऱ्याची योग्यता महान पदाची आहे. सेवेकऱ्याने वाटचाल करीत असताना सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून अखंड जे नाम बहाल केले आहे, त्याचे मुखाने नामस्मरण करीत वाटचाल केली तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच ! सत् मिळणे फार दुरापास्त आहे. रिद्धी सिद्धीच्या कोनातून वाटचाल कराल तर, आपल्या प्रभावाने चांगदेवाने सुद्धा काळाला फसविले, पण शेवटी तो कोराच राहिला. मग मुक्ताने त्याला अनुग्रह दिला. वाटेल ते मिळेल पण सत् सानिध्य मिळणे दूरापास्त आहे. देणारा देतो पण, टिकविणे फार कठीण आहे.
आता इतकेच, काही ज्योतीना प्रयासाने मिळते. त्याची किंमत त्यांना कळली आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळते. त्याची योग्यता त्यांना भासत नाही. पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली तर ते कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही. पुढे सुरु…….२ ©️