प्रभू राम : परंतु शुभदिनी थोडेसे सांगावेसे वाटते. आमच्या अवतार कार्यात थोडे का सेवेकरी होते. पण सेवेकरी कसा असावा? उदाहरण देत आहे. ज्यावेळी आम्ही वनवास पत्करला त्यावेळी अरण्यातून जात असता आम्ही एका अरण्यात पोहोचलो. समोर एक भिल्लीण होती. मनाने सत शुद्ध होती. मग आम्ही तिच्यापासून दूर होतो का?
वायुपुत्र हनुमानाला त्याच्या मातेने काय संदेश दिले होते? जो तुझी सोन्याची वस्त्रे ओळखिल त्याचाच तू सेवेकरी समज. त्याप्रमाणे झाले आहे. आम्ही वनवास पत्करला. अन अरण्यातून जात असताना एका वृक्षाच्या छायेखाली बसलो. त्यावेळी काही वानर इकडून तिकडे उड्या मारीत होते. परंतु हा वानर दिसला होता का? मी त्याच्याकडे अन त्याने माझ्याकडे पाहिले. दृष्टादृष्ट झाली. त्याने झाडावरून खाली उतरून दर्शन घेतले. तदनंतर तो आमचे बरोबर होता. त्यावेळी सीतेचे हरण झालेले होते. तिला शोधित होतो. हे भेटल्यानंतर सर्वस्व निवेदन केले. त्याने सांगितले चिंता करण्याचे कारण नाही. जसे आश्वासन दिले तसे घडवून आणले. मग सेवेकरी कसा असावा तर सद्गुरूंची दुःखे निवारण करणारा असावा. ©
