Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सर्व व्यापक तत्व, त्याचा अंत नाही ©️

सर्व व्यापक तत्व, त्याचा अंत नाही ©️

श्री विठ्ठल – सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे अन् त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यप्रविण असतो.

सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा. विठ्ठल हे एक आकारी तत्त्व आहे. आदेशाप्रमाणे त्यांनी फेकलेले आहे. ते कशासाठी? मानवांना भक्तीचे वळण लागावे, त्यांनी सत मार्गाने जावे याच हेतूने आम्हाला येथे पाठविले आहे.

सत् भक्तांची अतिशय तळमळ असते, त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने दर्शन द्यावे लागते. भक्तांना बोल गेले, ती वेळ निघून गेली आहे. म्हणून परम निधान एकच सत् आहे. या पलीकडे दुसरे कोणीही नाही. मात्र जो पारखी आहे, त्यालाच हे कळेल. इतरांना काही कळणार नाही. मग अखंड शक्तीची, महान शक्तीची ओळख करून देणारे व चुकलेली ठेव दाखविण्यासाठी कोणीतरी आकारी असावा लागतो. मग दैवत श्रेष्ठ का चुकलेली जागा दाखविणारे श्रेष्ठ? मी जर श्रेष्ठ म्हणावे, तर मी कोणाला तरी शरण आहेच. मग मी श्रेष्ठ कसा?

अनंत लाघवी शक्ती आहे. ती लाघव करावयास लागली, तर अंत मिळणार नाही. थोडीशी अहंकाराची झलक आली की असे होते. या अहंकारात ओळख राहत नाही. ज्याने सृष्टीची रचना केली, ज्याला रंग, रुप, आकार वगैरे काही नाही, सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त असणारे जे परम निधान तत्व, त्या तत्त्वापुढे आम्ही तुच्छ आहोत. ©️

You cannot copy content of this page