Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

समर्पण – श्री समर्थ – भाग दोन ©️

समर्पण – श्री समर्थ – भाग दोन ©️

भक्ती कशाला म्हणतात?

प्रत्येक सेवेकऱ्याच्या अंगी लिनता, नम्रता आणि शांती असलीच पाहिजे. जे जे सेवेकरी सांगितलेल्या वळणाने चालतील, त्याबाबत आपणांस सर्वस्व माहीत झालेले आहे. मग त्याप्रमाणे वागावयास नको का? प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीमागे मालिक छायेसारखे असतात. मग त्यांनी घालून दिलेल्या वळणाने वागावयास नको कां?

आपण एकच लक्षात ठेवणे – उपदेश कोणी दिला? देणारे कोण? सेवेकरी या नात्याने जो उपदेश, त्याप्रमाणे वागावयास नको कां? आपल्या कर्मसंचिता प्रमाणे जो ठेवा, त्याचे जतन करून, त्याचा पुढे उपयोग करावयाचा आहे. आपली मायावी कार्ये पार पाडून ही कार्ये करावयाची असतात. म्हणजे “संसार करूनच परमार्थ” ही काय चीज आहे, याची जाणीव होईल. अशा रितीने वागल्यास आपल्या गुरुंना किती आनंद होईल? त्याप्रमाणे वागून सर्वस्व आनंदमय करण्याचे सेवेकऱ्यांचे काम आहे.‌ मायावी प्रमाणे जी कृती, ती करावयास नको कां? ती सोडल्यावर कार्य कशी होतील?

काहीजण म्हणतात, “मालकांना सर्वस्व अर्पण केले! काय केले? आपण अर्पण करणारे कोण? सद्गुरू अंत:र्यामी असतात, तेच सर्वस्व करतात. ©️

You cannot copy content of this page