श्री समर्थ मालिक – प्रत्येक सेवेकऱ्याच्या मागे अचाट शक्ती आहे ना? तिला जर रोज उजाळा दिला तर ती किती खुष राहील. ती शक्ती रममाण कशी होईल याची विवंचना केली मग कसलीही भीती नाही. ज्या ठिकाणी शांतता त्या ठिकाणी तत्व रममाण होते.
त्या सताची शांती मिळाल्यानंतर मग पहावयास नको. असे जर असेल तर संसारात वितंड वाद निर्माण होणार नाहीत. दोन्ही आसनाचे सेवेकरी आहेत. दोघांच्या अंत:र्यामी एकच तत्व वास करते, ही तरी जाणीव आहे ना? अशी जर जाणीव असेल तर मग वाद का? वितंडवाद का? जड हे मायावी आहे. आकार हा मायावी आहे. प्रकृती ही चलाख आहे. तिच्या ठिकाणी मान अपमान आहे. प्रकृती भिन्न आहे, म्हणून तत्त्वाचा विसर पडतो. मान अपमान निर्माण होऊन वितंड वाद होतो.
दोन्हीही सेवेकरी पण मनात शंका निर्माण होते. त्यामुळे वितंडवाद होतात. त्या ठिकाणी विचार केल्यास वाद निर्माण होणार नाहीत. तेच तत्व शांती देते. ते कुणाला कुठे टिचकी मारतील आणि काय वदवून घेतील हे सांगता येत नाही. आपण हेच जर जाणले तर वाद विवाद निर्माण होणार नाहीत. ओळखल्या नंतर सेवेकरी चूप बसतो. मान अपमान किती आहे, हे तत्त्व ओळखते. (पुढे सुरु २)….©️