Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सद्गुरु महिमा ©️

सद्गुरु महिमा ©️

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे. मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत लागेल का? तेव्हा सत भक्ताने, सत् सेवेकऱ्याने त्यांच्या महिमेचा, लिलेचा विषय घेण्याची जरुरी नाही. तर एकाच ठिकाणी, ज्यांना शरण आहात त्याच ठिकाणी संपूर्ण लीन झालात तर लिलेचाही अंत लागेल. सद्गुरु कसे आहेत हे सुद्धा त्यांना पाहता येईल.

मग मात्र, सद्गुरु चरण त्यांना कुठे मिळतील? कसे मिळतील? सद्गुरु चरण कोठे आहेत? कसे सापडणार? कोठे जावयास पाहिजे? पंढरीला का त्या हिमालयात जावयास पाहिजे? मग कोठे जावयास पाहिजे? तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग जरी फिरलात तरी सद्गुरु चरण सापडतील का? मग कुठे सापडतील? याचे उत्तर एकच, ते आपल्या हृदयाच्या ठिकाणीच सापडतील हे सत्य आहे. मात्र सेवेकरी कृतिमान पाहिजे. सेवेकरी त्या तऱ्हेने कृतिमान झाला, मग मात्र हृदयातच सद्गुरु चरण आहेत ते समजेल. हृदयातील सद्गुरु चरणात लीन होऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. अगाध महिमा त्याच ठिकाणी पहावयास मिळेल. जोपर्यंत स्वस्वरूपी लीन होत नाही, तोपर्यंत लिलेचे, महिमेचे वर्णन करता येणार नाही. एकच, चावी सापडली की, मग सर्वस्व वर्णन करता येईल. आम्ही, माझ्या समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरणात लीन होतो म्हणूनच गती मिळते. तेच सर्वस्वाचे निधान आहेत. मी, माझे समर्थ जनार्दन स्वामी, त्यांना मी सर्वस्व वाहिले होते. त्याप्रमाणे आमची ठेवण होती. मग दुसरीकडे भटकण्याची आवश्यकता काय? ©️

You cannot copy content of this page