आपले आसनावर बसलेलें सदगुरू कसे आहेत? ते आतून बाहेरून पहा. प्रयत्न करा. मालिक व आसनाधिस्त निराळे नाहीत. एकच आहेत. ही सर्व माया नटविली आहे. आपण सत कृतीने कार्य करीत असता, त्यात बिघाड झाला तर ते कार्य फुकट जाते.
हजारो वर्षे तप:श्र्चर्येत गुंग असणाऱ्या तपसव्यांना अजून दर्शन नाही. मग मानव ज्योतीला मिळेल काय? हक्क आहे! मिळविल. त्या तऱ्हेने आपल्या प्रत्यक्ष सानिध्यात असतील तर मिळेल. प्रत्यक्ष स्थुलात दर्शन मिळेल. ओळखले पाहिजे. आपल्या सेवेकऱ्याला मालिक कधी दुसऱ्याच्या दारावर भीक मागण्यासाठी पाठविणार नाहीत. जर ते गेले, तर मालिकच भीक मागण्यास गेले असे त्याचा अर्थ होईल.
आपले सेवेकरी सर्व ऐकतात. जी कृती, कार्य झाले ते सत आहे असे याठिकाणी वाटते. दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर मायावी युगाप्रमाने वागतो. वाडीच्या बाहेर गेल्यानंतर मायेत पूर्ण गुरफटतो. म्हणून मालिक जे काही सांगतात, ते पूर्णत्वाने लक्षात ठेवा. पूर्ण विचार करा. अमोलिक बोल साठवून ठेवा. आपलीच उत्तरे आपणास आपोआप मिळतील. त्याच्या योगानें सेवेकरी जास्त सुधरत जातो. परंतु फक्त याच ठिकाणी त्याच्या मनावर परिणाम होतो. बाहेर गेल्यावर परत मायेत गुरफटतो.
खरोखर नामस्मरण मनापासून पाचच मिनिटे का होईना करतो. ते मालकांच्या चरणी रूजू होते. त्या ज्योतीवर एक प्रकारचे तेज झळकत असते. त्याने सहज वर पाहिले तर त्याच्याकडे कोणीही नजर भिडवणार नाही. तेव्हा नामस्मरण त्या वृत्तीचे, त्या पदाचे केल्यास, तो मार्ग आपणास मिळेल. ©️