Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सद्गुरु चलाख नसतील तर…©️

सद्गुरु चलाख नसतील तर…©️

श्री विठ्ठल – सद्गुरुना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयंमेव तत्व असल्यामुळे ते स्वयमच चलाख आहे. सत् चलाख आहे म्हणूनच सेवेकऱ्यांना अनुभव देता येतो.

सेवेकऱ्यांना प्रत्यक्षात अनुभव दिलेला आहे. थोडे या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. ज्या सेवेकऱ्यांनी सद्गुरु चलाख आहेत, हे अनुभवलेले आहे, त्यांना दहशत आहे. अजून अज्ञानाचे पांघरूण घेऊन राहिलेले आहेत, ते ते पांघरूण दूर सारतील त्याच वेळेला त्यांना कळेल, सद्गुरु ही काय चीज आहे?

हल्लीचा काळ असा आहे? परमेश्वर वेगळा आहे तो कसा पाहता येतो? सद्गुरुना समजतात की आपल्या सारखाच मानव आहे. ही मानवांची भूमिका आहे. ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु ही काय चीज आहे हे कळले नाहीतर ध्यान कसे करणार? ज्याला याचा गंधच नाही, तर कपाळी टिळा लावील कसा? गंध हे काय आहे हे ओळखले म्हणजे तो टिळा लावून शुद्ध बनतात. नुसता टिळा लावून शुद्धत्त्व होत नाही. सद्गुरू ज्यावेळेला त्याला टिळा लावतील, तेव्हाच तो शुद्ध (अनुग्रहित) होईल. वाटचाल करील. तो तरी वाटचाल करणारा कोण? सद्गुरु त्याला दाखवितात, फिरवितात. मी पाहतो, मी अनुभवतो. दाखवतो कोण? फिरवतो कोण? हे जोपर्यंत कळले नाही, तोपर्यंत अज्ञानात आहे असे म्हटले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page