सद्गुरु म्हणजे काय?
सद्गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर मानले पाहिजे. आयुष्याचे कल्याण करणारे तेच आहेत. प्रथम गुरु आपण देव मानला पाहिजे. गुरु हे पद फार श्रेष्ठ आहे. गुरुला मुकला तो सर्व आयुष्याला मुकला. प्रथम गुरुभक्ती केल्याने, पुढील मार्ग सोपा आहे.
परंतु प्रथम गुरु कोण? कसा आहे? हे जाणून, त्या ठिकाणी कोण आहे, हे समजावून घेतले पाहिजे. गुरु म्हणजे देवच होय असे समजून मार्ग आक्रमित गेले पाहिजे. त्या मार्गातील अडथळे गुरूच सोपे करतात.
आपल्या प्रयत्नाने अडथळे दूर होत नाहीत. ज्यावेळी आपण गुरु करतो, त्यावेळी गुरु आपली निम्मी शक्ति शिष्याला देतो. आपण सद्गुरूला साक्षात देव मानून आयुष्याचे कोटकल्याण करून घेतले पाहिजे.
परंतु ह्या काळात, कोणीही गुरु करीत नाही. करणारे आहेत, पण मार्ग दाखविणारे नाहीत…….. पुढे चालू (२) ©️