Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

सत कर्तव्यापासून दूर…..(२) ©️

सत कर्तव्यापासून दूर…..(२) ©️

हे सर्वस्व तुमच्या कृतीच्या आधीन आहे. पण याच्या उलट, दृश्य धन लाभल्यावर त्याला इतरांची किंमत वाटत नाही. ओळख रहात नाही. त्यात तो एवढा गुरफटतो कि, त्याला वाटते हेच सर्वस्व परब्रम्ह आहे. यातच सर्वस्व स्थावर जंगम संपत्ती आली. या व्यक्त धनासाठी कोर्ट कचेऱ्या, भानगडी वाढतात. भांडणे होतात. एवढे जरी झाले, तरी व्यक्त धन त्याच्याबरोबर जाते कां? 

आपल्या या भूमीत आपले पूर्वज होऊन गेलेत. त्यांनी कितीसे धन आपल्याबरोबर नेले? धन तरी त्यांच्याबरोबर गेले कां? नाही. जाताना जे दृश्य धन आहे, संपत्ती आहे, ती सुद्धा बरोबर येत नाही. म्हणून हे सर्वस्व झूट आहे. झूठा पसारा आहे. कोणीही कोणाचे नाही. म्हणून निष्काम व्हा ! संपत्ती मिळाली म्हणून वाटेल तशी उधळू नका. ज्याचे प्रथम घर समाधानी, तोच समाधानी असतो. म्हणून संचिताप्रमाणे कितीही संपत्ती मिळाली तरी तिचा योग्य तर्‍हेनेच उपयोग करा. याचा अर्थ असा नव्हे कि, व्यक्त संपत्तीला लाथाडणे.

स्थुलाला व्यक्त संपत्तीची जरूर आहे. हे जरी आहे, तरी आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्योतीचा सुद्धा त्यात हिस्सा आहे. त्यांना सांभाळूनच स्थिर ठेवावे लागते.

मन स्थिर राहण्यासाठी धनाची आवश्यकता लागते. म्हणून धन पाहिजे. संचिताप्रमाणे ते मिळेल. देणारच ! पण धनाचा लोभ असता उपयोगी नाही. साठवा, बँकेत ठेवा, पण सत् कार्यी लावा. हाव धरू नका. धन मिळते ते एकाचेच नाही, तर तुमच्या सानिध्यात ज्या ज्योती असतात त्यांचा पण हिस्सा असतो. पशुपक्षी बघा ! त्यांना जे मिळेल ते आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्योतीना भरवतात. त्यांचे उदाहरण नजरेसमोर ठेवण्यासारखी नाही कां? म्हणून दृश्य संपत्तीमुळे किती घरांचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे भांडणे होतात. वाद वाढतात. कितीही परममित्र असला तरी धनामुळे तो शत्रू बनतो. एवढे खरे की, दृश्याला दृश्याची जरुरी आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page