Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत् निराकार, सद्गुरु म्हणजे आकार ! ©️

सत् निराकार, सद्गुरु म्हणजे आकार ! ©️

माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे हेच सताचे बोल ओळखावेत.

सर्वांना अन्न पाणी देणारे, पोसणारे हे एकच तत्व आहे. ते सर्वभूतेषु पश्य आहे. आम्हाला कशासाठी पाठविले आहे? आम्हाला सुद्धा कानपिचक्या मिळतात. त्या कोणाला? तर प्रकृतीला, तत्त्वाला नाही. म्हणून होता होईल तेवढे चुकण्याचा प्रयत्न करू नका.

सद्गुरु ! सद्गुरु म्हणजे तरी काय? अन् हे कसे आहेत? सत् आणि गुरु ! सत् सोडून गुरु ही दोन अक्षरे आहेत. सताला आकार नाही. गुरुला आकार आहे.

पुढे संस्कृत श्लोकच आहे – गुकारो प्रथमो वर्णो, मायादि गुणभासक: | रुकारोsस्ति परं ब्रह्म माया भ्रांती विमोचकम् || म्हणून जे सत् आहे, तेच पूर्ण प्रकाशात फेकतात अन् ते सुद्धा आकाराला धरूनच, म्हणून आकारातच ते तत्व आहे. कारण ते आकार अन् निराकार एकरूप झालेले असतात. ते अन् हे वेगळे नाहीत. म्हणून आकाराचीच पूजा केल्याशिवाय हे काही एक मिळणार नाही. ज्या आकाराला आपण शरण आहात, त्याच आकाराला ओळखावे. हे सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे. अन् आकाराच्या ठिकाणी तुम्ही पूर्णत्वाने ठाम आणि श्रद्धायुक्त असाल तर मग ओळखण्याची आवश्यकता नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page