Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

सत् तत्त्वाप्रमाणे चला…©️

सत् तत्त्वाप्रमाणे चला…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकर्‍यांनी सत् तत्त्वाप्रमाणे चालले पाहिजे. याप्रमाणे सेवेकरी होऊ लागला तर त्या ठिकाणी लाघवीचे काही चालत नाही. मीच थोडीशी पाहणी करतो. सेवेकरी तत्त्वाच्या ठिकाणी ठाम झाले तर मला काही करता येत नाही.

मी आकारी आहे अन निराकारी पण आहे, पण एकच म्हणावयाचे, जे आकाराकडून संदेश मिळतात, सांगणे होते त्याची जोपासना सेवेकर्‍यांनी केली पाहिजे. तरी सेवेकर्‍यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तणूक ठेवल्यास, त्या ठिकाणी थोडासा का होईना विचार करावा लागतो.

सेवेकरी थोडासा जरी मनाच्या आधीन बनला, मनाप्रमाणे चालला मग त्या ठिकाणी थोडेसे लाघव देखील करावे लागतात. मनाच्या आधीन बनणारे सेवेकरी नसतील आणि नाहीत असे म्हणावे तर सेवेकरी एवढ्या पाठीमागे राहिले नसते. जे जे सेवेकर्‍याच्या मनाला येईल त्याचे गोड कौतुक समर्थ पुरवितात. पुरवले जाते. मनाचे आधीन असले तरी त्या सेवेकऱ्याचे कोडकौतुक पुरविण्याचे बाकी ठेवले आहे का? ©️

You cannot copy content of this page