श्री नर्मदा निवासी मालिक – आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका होतात. मग मानवांचे काय? लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही.
भक्तीची अंगे दोन आहेत – १) एक सत् भक्ती अन् २) दुसरी असत भक्ती. म्हणून त्या ठिकाणी लाघवी तऱ्हा होत असते. सताचेही भक्त आहेत आणि अघोरही भक्त आहेत, म्हणून दोन्हीही आपआपल्या तऱ्हेने भक्तांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण सत् हे सतच आहे. ते सताचीच बाजू घेत असते. अखेर सताचाच विजय होतो. मायेचा विजय होणे दुरापास्त आहे.
सध्याची परिस्थिती कोणत्या तऱ्हेने चालली आहे? आदि अंतापासून सर्वच काही सताचे भक्त नाहीत. सताचे भक्त कधीही वाया जाणार नाहीत. पण मायेचे भक्त त्यांना अशी मनोभावना होती की हेच सर्वस्वाचे निधान आहे. आपल्यापुढे कोण जाणार आहे? ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र यांनी ते परिपूर्ण असल्यामुळे ते उन्मत्त होतात. सताचे कर्तव्य धीर गंभीर आणि शांततेचे असते. त्या ठिकाणी माया ही आडवी पडते म्हणजे तिचे काही चालत नाही. ©️
