Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री समर्थ सद्गुरु भंडारा (१३ वा)©️

श्री समर्थ सद्गुरु भंडारा (१३ वा)©️

दिनांक: १६ डिसेंबर १९७२ रोजी साजरा करण्यात आलेल्या श्री सद्गुरु भंडारा उत्सवावेळी श्री समर्थ मालकांनी दिलेले शुभसंदेश –

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हा सुख सोहळा अधिक आनंदी वातावरणात साजरा होत आहे याबद्दल चिंता नको. माझा मीच आनंदात होतो. सेवेकर्‍यांनी शुद्ध भावनेने केलेली सेवा चरणांवर रुजू होत असते. रुजू करून घ्यावी लागते. ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे या वातावरणाच्या त्रिवेणी संगमात सेवेकरी डुंबतात, त्याचप्रमाणे आम्हीही या वातावरणात डुंबत आहोत. 

सत्पुरुषांचा तांडा आहेच. त्याचप्रमाणे गणगंधर्वही या ठिकाणी आहेत. अन्नपूर्णा अजून पर्यंत या ठिकाणी आहे. पाहणाऱ्यांनी पाहिले असेलच. 

मागील आदेशाप्रमाणे वरचेवर घडत आले आहे यात शंका नाही. येथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. उ:षापाचा काळ संपत आला आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल, पण सेवेकर्‍यांनी बिलकुल घाबरू नये. तिजोरी (अखंड पदाचे अखंड नाम) दिली आहे. तिची जोपासना करणे.

हल्ली ठिक ठिकाणी अनुभव मिळत आहे. संकटाच्या वेळीच मानवांना माझी आठवण होत असते. सुखी असले तर हजार दैवते पुजतात. पण अखेरीस माझी आठवण होते. आठवण करतो. इथून पुढे फारच दिवस कठीण आहेत. ते पहाल, सांगू शकाल. मात्र जे कर्तव्य आहे ते चालूच राहील. यात न्यूनता होणार नाही. सेवेकऱ्यांनी चिंता करावयाची नाही. मात्र दिलेली तिजोरी चोख ठेवण्याचा प्रयत्न करणे. मी एकाच नामातीत आहे यातील अर्थ आपण ओळखावा. ©️

You cannot copy content of this page