Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री समर्थ मालिक संदेश – ©️

श्री समर्थ मालिक संदेश – ©️

श्री समर्थ मालिक – मी एकदाच प्रणव दिलेला आहे. ते प्रणव खोटे होऊ देणार नाही. हे सत्य आहे. कर्तव्यात सेवेकर्‍यांनी पाठीपुढे व्हावयाचे नाही. बाकीचे काही बोलता येत नाही. ते कसे करावयाचे ते माझे मी जाणतो. वेळ जवळ जवळ येत चालली आहे. सेवेकर्‍यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. नाही पेक्षा सेवेकरी माझ्या दृष्टी आड येतात. नजरेसमोर येतात. त्यांचा दृष्टिकोन असा नाही. त्यांच्यावर माझी नजर आहे. तरी जी घडण घडवायची ती घडवून घेणार आहे. सेवेकर्‍यांनी घाबरावयाचे नाही. ती वेळ आत्ता आलेली आहे, पण अमुक वेळेला होणार हे सांगणार नाही. पण होणार. वेळ नजीक आलेली आहे.

या तीन आराखड्यातून कर्तव्य राहील असे मला वाटत नाही. पूर्ण अघोर उपटून काढण्याचा प्रयत्न आहे. अघोर उपटून काढल्याशिवाय शापदग्ध भूमी पवित्र होणार नाही. अग्निचा कल्लोळ, ज्या वेळेला पर्वतात वनवा लागतो, तो विझविल्याशिवाय शांती नाही. तो विझविण्यासाठी महान कृती करावी लागते. त्याशिवाय तो शांत होणार नाही. तो फार वर्षापासून सारखा धूमसत आहे. त्याची पूर्तता करणे माझे कर्तव्य आहे. या महान अग्निच्या तोंडाला कोणाला द्यावयाचे हे मलाच माहित आहे.

हि तीन संक्रमणे आहेत. एकातून जरी वाचला तरी दुसरे, दुसऱ्यातून जरी वाचला तरी तिसऱ्यात सोडणार नाही. हे ठाम आहे. मग तुम्ही काही करा. हे कर्तव्य घडल्या शिवाय राहणार नाही. तप:श्चर्या करा अथवा झाडाला उलटे टांगून घ्या, अथवा काही करा, पण सोडणार नाही. आपणाला आज संदेश द्यावेसे वाटतात, आपण जरी तप्त असलात तरी वरून दाखवायचे नाही. सर्व लोक सारखे आहेत असे काही नाही. मानव आहे म्हणून आपला तप्तपणा कोणाच्या नजरेस येणार नाही असे करा. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page