सेवेकरी ऐकत नाहीत, म्हणून असे सांगावे लागते. दोन्ही सारखीच आहेत. असे सांगण्याचे कारण, या भीतीने तरी, त्यांनी चांगले वागावे. ज्यावेळी आपण सातारला गेला होता, त्याप्रमाणे स्थिती ठेवणे.
दरबारची वेळ ४ ते ८ दरम्यान राहिल. त्यावेळेला याच ठिकाणी ते खडे राहतील. नियमाप्रमाणे वागा व कृती करा. याने मालकांना आनंद होईल. आनंदाच्या भरात आदेश सुटतील. इच्छेप्रमाणे प्रवचन होईल. शंका विचाराव्यात. भक्ती वर विचारल्यावर सांगतील.
आपली वळणे चांगली ठेवा. चुकांची नोंद होईल. सेवेकरी म्हणतील, आसनावर कोणी नाही. कसे ही वागा. पण आसनावर कोण आहेत? याची जाणीव ठेवून वागा.
आरती घेण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. प्रत्येकाचे मन शुद्ध पाहिजे. गढूळ नको. प्रवचनावर विचार करा. शंका विचारा. मात्र ऐकून सोडून देऊ नका. आपले सेवेकरी म्हणतात, “बाबा याठिकाणी नाहीत.” पण बाबा कोणत्या स्वरूपात आहेत, याची जाणीव घ्या. ते रुप पाहाण्याचा प्रयत्न करा व त्याप्रमाणें वागा. सद्गुरु व तुम्ही एकच आहात. पण ते कसे दडलेले आहेत, याची जाणीव घेण्यासाठी प्रयत्न करा. मानव म्हणजे ईश्वर आणि तो अशा तऱ्हेने नटलेला आहे. ©️
(समाप्त)