Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री सद्गुरु महिमा ©️

श्री सद्गुरु महिमा ©️

सद्गुरू पदोपदी आपणास प्रणव देत असतात की मन सद्गुरू चरणांवर बहाल करा. ज्या सद्गुरूंना शरण आहात तेच सत आहेत. जे सत तेच सद्गुरु! त्यांच्या मुखातून जे प्रणव मिळत असतात, ते सतमय प्रणव असतात. तेच प्रणव आपल्या सेवेकऱ्यांना कुठपर्यंत पोहोचवतात, तर सत चरणांप्रत पोहोचवतात.

या भूतलावर अराजकता माजली आहे. कलियुगी स्थिती आहे. या कलियुगी स्थितीत किती स्थितीचे गुरु आहेत?

सद्गुरु अन गुरु ! जे सद्गुरु आहेत त्यांचे प्रणव सतमय स्थितीचे असतात. तेच सतमय प्रणव सद्गुरु चरणांप्रत नेतात. या स्थानात आल्यानंतर मानवाची जी स्थिती होते, ते मानव अनेक स्थानातून आलेले असतात. जे प्रथम प्रणव दिले ते सद्गुरु अन गुरू! जे सद्गुरु सत प्रणव देऊन सत चरणाप्रत नेतात तेच सद्गुरु ! त्यांचा महिमा अगाध आहे.

सद्गुरु म्हटल्यानंतर तेथे सगळे लिन असतात. ज्याप्रमाणे सद्गुरु, त्याप्रमाणे सत सेवेकरी ! सेवेकरी त्याच वृत्तीचा पाहिजे. सद्गुरु प्रणव देत असतात, सत वृत्तीने चला. सद्गुरु सत प्रणव देत असतात, म्हणून सेवेकरी सत चरणांप्रत जातात. गुरु अन सद्गुरु! गुरु मोहमायेत गुरफटलेले असतात. आपल्याला सत मायेत जावयाचे आहे. सत प्रणव सद्गुरुं पासून मिळतात. मग हा महिमा अगाध आहे ना? म्हणून मोहमायेत न जाता सत मायेत जाणे. ©️

You cannot copy content of this page