Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

श्री ज्ञानेश्वर माऊली……प्रवचन (४) ©️

श्री ज्ञानेश्वर माऊली……प्रवचन (४) ©️

सद्गुरु चरणांचा अंत घेतल्यावर मुक्ती शोधण्यासाठी कोठेही जावे लागत नाही. सद्गुरु चरणात लीन झाल्यानंतर तो ब्रह्ममय आनंद मिळतो त्याचे वर्णन करता येणे शक्यच नाही. त्या सद्गुरु चरणांचा आशिर्वाद प्रत्येकाने घ्यावयास पाहिजे. स्वानुभव घेतल्या खेरीज ते कसे आहेत ह्याची जाणीव होणार नाही. त्या अनुभव प्राप्तीसाठी सद्गुरु चरणात लीन होणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

सद्गुरु शोधण्यासाठी कोठेही जावे लागत नाही. ते जवळ आहेत, तसेच ते दूर आहेत. त्यांना शोधावे लागत नाही. ज्यावेळी सर्वस्व सद्गुरु चरणांवर समर्पित करतो, त्या चरणांशी लीन होतो, त्याचवेळी सद्गुरु आपल्या बरोबर आहेत हे सिद्ध होते.

मनाचे तरंग असतात तोपर्यंत त्यांचा अंत लागत नाही. सद्गुरु कृपेचे सागर आहेत. त्या छायेखाली जो रममाण होतो, तेथेच त्याला मुक्ती प्राप्त होते. तिच खरी मुक्ती ! तेच खरे ब्रह्मस्वरूप. !! याच्या खेरीज दुसरे ब्रह्म कोणते? जे होते, ते सर्व सद्गुरु कृपेनेच होत असते. जे पाहिजे ते सद्गुरु देत असतात.

सद्गुरुमय झाल्यानंतर, तेथेच तन्मय झाल्यानंतर, मुक्ती तेथेच आहे. आपल्या भक्ती मार्गाने सद्गुरुप्रत जाणे आणि भक्ती मार्गाने आपल्या सद्गुरूंना पाहणे, तेथेच रममाण होणे आणि अशा तऱ्हेने तन्मय होण्यासाठी षड्रिपूंचे मायावी जाळे तोडणे, ते द्वार, मायावीच्या पलीकडे आहे. हेच शोधणे आणि त्याच करीता सर्वस्व सद्गुरु चरणांवर समर्पित करणे आणि सद्गुरु दर्शन घेणे हीच मुक्ती होय.

प्रश्न : चारही मुक्त्या कोणत्या?

उत्तर – आपल्या सद्गुरु चरणात विलीन झाल्यानंतर चारही मुक्तीचा प्रश्नच कोठे राहतो? हिच सर्वस्व अखंड मुक्ती ! ही साधल्या नंतर चारही मुक्त्या साधल्या सारखेच आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page