Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्रीराम नवमी संदेश ©️

श्रीराम नवमी संदेश ©️

वेळोवेळी सतपद या ठिकाणी संदेश देत आलेले आहेत व देतही आहेत. या पदाच्या आसनाचे कर्तव्य प्रगतिशील, उज्वल अन् भरभराटीचे आहे. आतापर्यंत ते अव्याहत, अवर्णनीय असे चाललेले आहे. पुढेही परम गतीने होणार आहे. माझ्या अवतार कार्याच्या वेळेस अघोरांचा स्थूलांगी नि:पात केला. त्याचेच शेष राहिलेले हे कार्य सतपदाचे आसन करीत आहे. अघोरांना या शिवाय दुसरी कोणतीही गती नाही. हेच ते अघोर राक्षस, यांचा नि:पात करण्याकरिता मी माझ्या समर्थ संदेशाप्रमाणे कर्तव्य परायण होतो. माझ्यावर त्यांची अखंड देखभाल होती अन् आहे.

मी जरी राम असलो, तरी माझ्याकडून कर्तव्य करून घेणारे तेच ते परम तत्व, तेच श्रीराम आहेत. मला जरी पूर्णत्वाने सत्ता बहाल केली असली, तरी मी तिचा दुरुपयोग कधी केला नाही. मानवी तत्त्वाप्रमाणे सर्वस्व कष्ट सहन करत करत सत्यासाठी अहर्निश झगडलो आणि अखेर अहंकाराने परिपूर्ण असलेल्या रावणाचा पूर्णपणे नि:पात केला. नंतरच माझ्या कर्तव्याची इतिश्री झाली. तरीसुद्धा माझ्या कर्तव्याची वाटचाल चालूच होती. परत अयोध्येला येताना कोकणात ज्या ठिकाणी समर्थ आसन आहे, त्या ठिकाणी सीतेसह उतरलो. माझा पूर्णपणे त्या भूमीत वास आहे. नंतर तेथून मी अयोध्येला गेलो. ज्या ठिकाणी उतरलो, ती भूमी फारच शुद्ध आहे. त्याच भूमीच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष समर्थ आसन त्या ठिकाणी पडले आहे. ©️

You cannot copy content of this page