Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

शुद्धीकरण मानवाचे…©️

शुद्धीकरण मानवाचे…©️

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती नाही.

या भूतलावर अनंत कण निर्माण केले आहेत. या अनंत कणात, ज्या कणाला सताची पूर्णत्व कल्पना आहे, त्याच कणाची पूर्णत्व कल्पना घेतली पाहिजे. मग तो कण या स्थितीत कितीही कहर झाला तरी कसा राहील? तेजोमय राहील, पण तो कण जर संशय स्थितीने कर्तव्य करू लागला तर सता कोणती स्थिती? तर नाश करावयाचा.

जो सत कर्तव्यात राहील त्याला सर्वस्व सत संरक्षण देईल. कर्तव्यात न राहील तर संरक्षण मिळेल का?

सेवेकर्‍यावर अवलंबून असलेल्या ज्योती जर संशयी असल्या, तर त्यांचे काय? या ज्योती पासून दुसऱ्या ज्योतीची उपस्थिती आहे, ती संशयाने बरबटल्यानंतर कोणती स्थिती करणार? ही स्थिती आजतागायत होत गेली आहे अन म्हणूनच हे संशय युग वाढले आहे.

एका ज्योती मुळे अनेक ज्योतींचा लाभ होतो. अति कहर झाल्यानंतर कोणती स्थिती करावयाची? एक ज्योत कोणती स्थिती करील? महामुनी वशिष्ठांनी कोणते कर्तव्य केले? कहर झाला तरी सतोपदेश करीत होते. ज्यांनी ग्रहण केला ते आपल्या सानिध्यात आहेत. ज्यांनी ग्रहण नाही केला त्यांचा नाश झाला.

महामुनी वशिष्ठांच्या सानिध्यात ज्योती होत्याच ना? ज्यांनी मान्य केले ते सानिध्यात आहेत. ज्यांनी मान्य केले नाही ते पूर्णत्वाने नष्ट झाले. सतयूगा पासून जी गुरुकुले अघोरांनी नष्ट केली ती आपण पूर्णत्वाने निर्माण केली आहेत ना? त्यांना सानिध्यात घेऊन दर्शन युक्त केले आहे. त्या ज्योती ठाम होत्या. मानवाने ही स्थिती केल्यानंतर नाही का होणार? मानवाने हे पूर्णत्व केलेच पाहिजे व झालेच पाहिजे. दृश्य जे प्रणव देते ते दृश्याने मानलेच पाहिजेत. मग दृश्य संरक्षण देणार नाही का?©️

You cannot copy content of this page