Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

वेळ आली म्हणजे…©️

वेळ आली म्हणजे…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकर्‍यांची कल्पना चांगली आहे, स्थूलावर कर्तव्य व्हावे. वेळ आल्यानंतर कर्तव्य करा सांगण्याची आवश्यकता नसते. वेळ आल्यानंतर कर्तव्यास अवधी लागत नाही. बारा वर्षाचा काळ सहज निघून गेला. पण पूर्वीच्या काळा इतकी सहनशीलता झेपत नाही व सोसत नाही. या उ:शापाच्या काळामध्ये काय होईल व कशी मानवाची बुद्धी फिरेल सांगू शकत नाही. जशी मानवांची बुद्धी, तशी मनाची भावना कळते. पळण्यास मोकळीक! थोडा काळ पुढे ढकलला आहे. कोणीही वाईट वाटून घ्यायचे नाही, नाराज व्हावयाचे नाही. पहिल्या पासूनची ती भावना आहे. त्रास झालेला आहे, होत आहे. अवधी बाबत वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. का अवधी लागतो आहे, सर्वस्वाची गती आहे. सर्वस्वाचे स्पष्टीकरण करावे कसे?

सत हे केसापेक्षाही अगदी मृदू आहे, लोण्यापेक्षा मृदू आहे. सताची मृदुता केव्हा काय करते याची कल्पना मानवाला नाही. अन ज्या ज्या वेळी अवतार कार्य घेतले त्याची कल्पना चांगल्या तऱ्हेने आहे. अवतार कार्यामध्ये युद्ध करावे लागले होते. मानवी तऱ्हेने कष्ट काढलेले आहेत. भक्तगणांनी प्रमाणाबाहेर त्रास सहन केला. काही कारणास्तव, आजचे उद्या केलेले नाही. कर्तव्य होणार हे निश्चित! ते सांगून होणार असे नाही. अघोर कसे असते, खाऊन पिऊन सुखी असते, चोर सुळसुळीत असतो. चोर व अघोर सुळसुळीत असतात. भक्तीचे तेज नाही व तो फुगलेला असतो. केव्हा वेळ आली म्हणजे फुटून जातो. ©️

You cannot copy content of this page