Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

वेद अनंत बोलीला | ©️

वेद अनंत बोलीला | ©️

श्री समर्थ मालिक – वेद अनंत बोलीला | अर्थ इतकाच काढीला || निजनिष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलासी जावे ||

वेद म्हणजे काय? हा किती तऱ्हेने सुटतो? बोलाचा अंत सापडला आहे काय? बोल, प्रणव कोठून सुटतात? चैतन्याची घुसळण झाल्याशिवाय वेदना नाही. वेदना झाल्यानंतर प्रणव सुटतात. ह्यालाच वेद म्हणा अगर काही म्हणा !

हे कोठून, कसे, कोणत्या तऱ्हेने सुटतात याचे विवेचन कोण करतो? हे कशासाठी होते? याचा आचार विचार ज्याने जाणला, त्यानेच जाणला. इतरांना यांचे कोडकौतुक वाटत नाही. ज्याला वाटते, त्याने आपल्या हृदयात साठवावे. ज्याने हे जाणले, त्याने पूर्ण कवटाळून ठेवले. मग विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, स्वयंभू म्हणा काही म्हणा असे मानवाचे आहे.

पण जो सत् तत्त्वात गुंगला, त्याची कृती बघा अन अहंकाराने मायावीत गुरफटलेला मानव बघा. त्या दोघात किती अंतर पडते? बोलाचा किती फेरफार होतो? वेदना निर्माण झाल्यानंतर प्रणव सुटतात. पण सत् आणि मायावी प्रणव यात बराच फरक असतो. ©️

You cannot copy content of this page