लक्ष्मी – धन, धान्य, ऐश्वर्य, आर्थिक विकास, प्रगतीचे प्रतिक आहे असे मानले जाते. ही, लक्ष्मी म्हणून जशी ओळखली जाते, तसेच ती महालक्ष्मी म्हणून देखील ओळखली जाते.
सत् म्हणते, लक्ष्मी दोन प्रकारची असते. एक, सत् लक्ष्मी आणि दूसरी, असत लक्ष्मी ! सत् लक्ष्मी ही सात्विक लक्ष्मी, तर असत लक्ष्मी ही असात्विक लक्ष्मी होय किंवा हिला चंचल लक्ष्मी देखील संबोधिले जाते. सत् लक्ष्मी जी सात्विक लक्ष्मी असते, ती नेहमी कशी असते, तर स्थीर आणि शांत ! असात्विक लक्ष्मी कशी असते, तर चंचल आणि अस्थिर !
आपण नेहमी सात्विक लक्ष्मीची कास धरावी आणि सन्मार्गाने ती मिळवावी. अशाप्रकारे मिळालेल्या लक्ष्मीला सताची साथ मिळते आणि आपले मानवी जीवन सन्मार्गाने व्यतित होते. जीवनात कधीही लक्ष्मीची वानवा राहात नाही.
तर अशा या लक्ष्मीची पूजा आज मंगळवार, दिनांक: २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुळाश्रमात श्री सद्गुरु माऊली कृपेकरुन व आशिर्वादाने, तसेच लक्ष्मी मातेच्या चरणी संपन्न झाली. या क्षणांची आठवण छायाचित्रांच्या माध्यमातून आपणांस सविनय सादर –



