Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी त्रिगुनातीत असणारे तत्व…©️

मी त्रिगुनातीत असणारे तत्व…©️

श्री स्वयंभू – मी त्रिगुनातीत असणारे एक तत्व आहे, अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी, त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे.

त्रिगुण तत्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ही तत्त्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत. स्वयंभू याचा अर्थ असा की, ज्यांनी सर्वस्वाला निर्माण केले ते ! तेच स्वयंभू आहेत.

समुद्रमंथनाच्या वेळी १४ रत्ने निघाली. त्यामध्ये विष हे एक निघाले. निर्माण झाले. ते कोणीही घेण्यास तयार झाले नाही. सगळ्यांनी चांगल्या चांगल्या वस्तू उचलल्या, पण हे कोणीच घेतले नाही. तेव्हा, काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा ते विष मी स्वतः घेतले अन् ते प्राशन केल्यानंतर काय स्थिती झाली. काय हाल झालेत ते माझेच मला माहित. ही माझी हाल अपेष्टा थांबेनाशी झाली तेव्हा मग त्या समर्थांनी, सद्गुरुंनी मला शांतता दिली. मग मी जर स्वयंभू असतो, तर ते विष मला जिरवता आले नसते का? मी जरी तर्पट असलो तरी सत तत्वासाठी भोळसट आहे. माझे भक्त काही असतील, काही विष्णूचे तर काही ब्रह्मदेवाचे असतील, पण जसे प्रकृतीचे अंग त्याप्रमाणे वर्तणूक असते. ©️

You cannot copy content of this page