Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी कोठे आहे…©️

मी कोठे आहे…©️

मी कोठे आहे हे त्यांना डोळस झाल्यानंतरच समजेल. हे सर्वस्व कोण करील? तर आकारच करील. अशा तऱ्हेने ॐ कार स्वरूप बनला की मग सत मार्गाने वाटचाल करील.

काही मानव आड मार्गाने जातात. लोकांना नादाला लावतात. स्वतःचे स्वहित साधतात, पण या ढोंगाने किंवा चमत्काराने मी कधीही सापडत नाही, मिळत नाही. मला रंग, रूप, आकार वगैरे काही नाही. मग मला कसे पकडतील? मला कसे पाहतील? सेवेकऱ्याने हट्टच धरला तर मी दर्शन देतो की नाही? पण कोणत्या रूपाने, हे मी गुप्त ठेवतो. नाही, मी लहान नाही, मी मोठा असा मी आहे. म्हणाल तसा मी आहे. सेवेकऱ्याच्या पात्रतेप्रमाणे सर्व घडत असते. मात्र सेवेकऱ्याने त्याप्रमाणे वाटचाल करावी हे संदेश आहेत.

एकच खुणगाठ बांधणे कि ज्या आकाराला मी शरण आहे, त्याला विसरू नये. ज्या आकाराने खूण दाखविली, त्यांचे दर्शन मिळाले पाहिजे. ज्या आकाराला शरण आहात, तेच आसनावर आरुढ आहेत. मग ध्यान कोणाचे करता?

वाल्याच्या हातात माणसे मारण्याची काठी होती. त्याला पश्चाताप झाल्यानंतर, त्याच ठिकाणी तो बसला. नारदाने त्याला नाम दिले. मग त्या शुष्क काठीला पालवी फुटली. नंतर नारद आणि मी, त्या ठिकाणी गेलो. मी वाल्याला हाक मारली. पण वाल्याने माझ्या हाकेला ओ दिली नाही. नारदाने हाक मारली, तेव्हाच त्याने डोळे उघडले. म्हणून ओळखीचे धीर गंभीर प्रणव कुठून येतात हे सेवेकऱ्याने लक्षात ठेवणे. न पेक्षा महामायेच्या हातात सर्व सूत्रे आहेत. कारण तिला अधिकार दिलेले आहेत. तो अधिकार ती दाखविते. तेव्हा सेवेकर्‍यांनी फसू नये. ©️

You cannot copy content of this page