Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

मायेचे काही चालत नाही ©️

मायेचे काही चालत नाही ©️

श्री नर्मदा निवासी मालिक – प्रत्येकाने आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका ह्या होतात, मग मानवांचे काय?

लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही. भक्तीची अंगे दोन आहेत – १) एक सत् भक्ती अन् २) दुसरी असत भक्ती. काही ठिकाणी लाघवी तऱ्हा होत असते.

सताचेही भक्त आहेत आणि अघोरही भक्त आहेत, म्हणून दोन्हीही आपआपल्या तऱ्हेने भक्तांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण सत् हे सतच आहे. ते सताचीच बाजू घेत असते. अखेर सताचाच विजय होतो. मायेचा विजय होणे दुरापास्त आहे.

सध्याची परिस्थिती कोणत्या तऱ्हेने चालली आहे? आदिअंतापासून सर्वच काही सताचे भक्त नाहीत. सताचे भक्त कधीही वाया जाणार नाहीत. पण मायेचे भक्त त्यांना अशी मनोभावना होती की हेच सर्वस्वाचे निधान आहे. आपल्यापुढे कोण जाणार आहे? ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र यांनी ते परिपूर्ण असल्यामुळे ते उन्मत्त होतात. सताचे कर्तव्य धीर गंभीर आणि शांततेचे असते. त्या ठिकाणी माया ही आडवी पडते म्हणजे तिचे काही चालत नाही. ©️

You cannot copy content of this page