Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मानव जन्माची स्थित्यंतरे -३-©️

मानव जन्माची स्थित्यंतरे -३-©️

रामदासांचे उदाहरण घ्या. रामदासांना थंडी वाजून आली, त्याच वेळेला शिवाजी महाराज त्यांना भेटावयास आले. रामदास स्वामी आसन सोडून बाजूला झाले. दोघे भेटत असताना, फक्त ते आसन हलू लागले. कापू लागले. शिवाजीला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “महाराज हे काय?” “हे प्रारब्ध आहे. आपण भेटायला आलात, आपले बोलणे, भाषण व्हावे म्हणून त्याला बाजूला ठेवले.

त्यांना ते घालविण्याची ताकद होती. पण आज ना उद्या ते भोगावेच लागले असते म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने याची आठवण ठेवून सत् मार्गाने जात असताना जर अडचणी आल्या, प्रसंग आले तरी धैर्याने तोंड देऊन वाटचाल करा. प्रत्येक ज्योत प्रारब्ध घेऊनच आलेली असते.

हे आदल्या जन्मीचे संधान असते. त्याची काळजी करावयाची नाही. आसना सानिध्यात असणाऱ्या ज्योती भाग्यवान आहेत. सानिध्य मिळणे कठीण आहे. एक-एक, दोन-दोन तपे झाली, त्यांना मिळत नाही. पण तुमच्या प्रारब्धाने ते मिळते आहे. श्रीमंत सावकार व्हाल, सम्राट व्हाल, परंतु आसन व सद्गुरु सानिध्य हे मिळणे दुरापास्त आहे. हा अमूल्य ठेवा मिळाला त्याचा अह:र्निष उजाळा करून जतन करा. हीच महान इच्छा आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page