(१) मालकांचे बोल – आसनावर असलेले तुलसीपत्र सेवेकऱ्यांशिवाय इतरांना घेण्याचा अधिकार नाही. जे भावी सेवेकरी आहेत, त्यांनी आसनाधिस्ताना विचारुन व त्यांनी परवानगी दिली तरच तुलसी पत्र घेणे.
उदाहरणार्थ – एका घरात दोन ज्योती आहेत – एक अनुग्रहित व एक नाही. ती भावी सेवेकरी मानली जाते. ती ज्योत त्या ज्योतीवर (सेवेकऱ्यावर) अवलंबून असते, अशी ज्योत आसनाधिस्ताना विचारुन तुलसीपत्र घेवू शकते.
(२) आसन दृश्य आहे, त्याप्रमाणे अदृश्यपण आहे. सेवेकऱ्याना व इतर ज्योतीना नम्रपणे सांगणे आहे की, इतर ज्योतींच्या मनात शंका येईल असे काहीही करु नका. ते शंका धरोत की न धरोत, विचार करोत अगर न करोत, संशय रहित व्हा, शुद्ध शूचि:र्भूत व्हा असा आदेश आहे.
(३) सर्वस्व शुद्धीकरण झाल्यावर मानवांचे शुद्धीकरण करावयाचे आहे. बाहेरचे व दरबाराचे जे मानव शुद्ध सत आहेत, मानवांसाठी झगडणारे आहेत, त्यांना ठेवणार आहे, दुसऱ्याचे वाईट पाहतात, दुसऱ्याचे वाईट इच्छितात, त्यांना ठेवणार नाही.
(४) समर्थ आदेश – आपल्या दरबारात सेवेकरी होतील, होणार आहेत, त्यांची पूर्ण पाहणी छाननी करून घ्यावी. ती घेतल्याशिवाय अनुग्रह नाही. या आदेशाचे कारण, अशा मानवांना अनुग्रह देण्यात अर्थ नाही, कारण दुसऱ्याच्या उचापती करीत राहण्याऱ्या मानवांचा काहीं अर्थ नाहीं.
(५) संत तुकाराम महाराज म्हणतात, “आताचे सेवेकरी आम्हांसारखा त्रास सहन करणार नाहीत. ज्ञानोबा सारखे त्रास सहनशीलता राखणे सुध्दा हल्लीच्या संतांच्या अंगी नसते.
(६) भक्ती रूपाने माऊली आपोआप सहनशीलतेचा मार्ग दाखवते. समर्थ माऊली रंग ढंग करीत नसते. तसे जर केले तर भक्ताला एक पाऊल सुध्दा पुढे टाकता येणार नाही. मानवी सेवेकऱ्याने कसे राहिले पाहिजे?
(७) आतापर्यंत संत मानवांचे किर्तन रूपी, प्रवचन रुपी, मन शुद्घ करीत आले. परंतु मानवांनी काय घेतले? ©️
(समाप्त)