Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

महाशिवरात्र ©️

महाशिवरात्र ©️

(म्हणूनच त्यांना महा असे म्हटलेले आहे….)

श्री स्वयंभू – मी प्रत्यक्ष शिव आहे असे मी म्हणू शकत नाही, कारण मी स्वयमेव नाही. मलाही कोणीतरी निर्माता आहे. आम्ही सुद्धा त्यांच्याच ध्यानात, लहरीत असतो. त्यांनीच आम्हाला घडविले आहे. त्यांनीच आमचे नामाभिधान ठेवले आहे. आकारालाच ओंकार म्हटले आहे आणि ओंकारालाच आकार म्हटले आहे. म्हणून ते म्हणत असतात, “कोणीही असला तरी, ओंकार स्वरूप बनू शकेल, पण मीच ओंकार आहे हे होऊ शकणार नाही”. हे शक्य नाही. पण प्रयत्न केल्याशिवाय ओंकार स्वरूप कसे बनेल, हे शोधले पाहिजे.

ओंकार स्वरूप मूळ कोण याची छाननी केली, तेच ओंकार स्वरूप बनविते. ते सगुणही बनते अन निर्गुणही बनते. त्यांची (ॐकारांची) उपासना आम्ही करीत असतो.

आम्हाला कर्तव्यासाठी पाठविले आहे. पण महाशिवरात्र ही संज्ञा!

महा+शिव याचा अर्थ काय? महाशिव हे पाहण्याच्या पलीकडे आहे, तेच महाशिव आहे. ते पाहता येते हा सिद्धांत आहे. ते पाहता आले पाहिजे. तितकी पात्रता सेवेकऱ्यानी मिळविली पाहिजे. ते पाहण्याची सेवेकऱ्याची पात्रता पाहिजे. आंधळ्याला हे कळणार नाही. तो म्हणतो हे कसे पहायचे? ते पाहता येते. पहाणे शक्य आहे.

मग शक्य काय अन अशक्य काय? याचे शोधन केले पाहिजे. शोधन केले तर ते शक्य आहे. सत मार्गाने गेला तर का सापडणार नाही? मनाची ठेवण शुद्ध, पवित्र ठेवून वाटचाल केली तरच पाहता येईल. असे ते सत आहे. असे ते शिव आहेत. तेच परम निधान त्यालाच महाशिव असे म्हटले आहे.

महाशिवाच्या ध्यानात एकच दिवस, तिच महाशिवरात्र एकादशी म्हटले आहे.

पण एकादशी म्हणजे काय? दहा इंद्रिये लय करून, अकराव्यात निमग्न झाली तर शिव पाहता येईल. तिच एकादशी आहे.

या दरबारच्या सेवेकऱ्यांना जाणीव आहे हे मला कळते. मी शिव आहे असे नाही. मी कर्तव्याला जागृत आहे. मी सर्वस्वाचे निधान नाही. त्यांचा मी एक सेवेकरी आहे. सत सेवेकऱ्याला दूर ढकलत नाहीत. त्याची फक्त लिनतेची ते पाहणी करतात. जो सत सेवेकरी आहे, तो मात्र या ठिकाणी वाक असे म्हणत नाही.

काही मानवांची भावना की या ठिकाणी काही दिसत नाही. त्यामुळे त्यांची भावना चंचल! म्हणून ते या ठिकाणी स्थिर होत नाहीत. सद्गुरु आदेशाप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे. माझे सद्गुरू माझ्याबरोबर, पण मी त्यांचे बरोबर आहे. कर्तव्याची मला दिशा दिली आहे. माझे भक्त खरे, पण त्यांची जशी भावना त्याप्रमाणे वाटचाल होत असते. या ठिकाणी दर्शन मिळाले घेतले हे माझे भाग्य आहे. महाशिव हे वर्णनाच्या पलीकडे आहे. म्हणूनच त्यांना महा असे म्हटले आहे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page