Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मन स्थिर होण्यासाठी ©️

मन स्थिर होण्यासाठी ©️

मन स्थिर होण्यासाठी – मन स्थिर होण्यासाठी तू त्यागी रहा. जे काही भले बुरे केले असेल, ते मला अर्पण कर. मन हे संपूर्ण समर्थांना अर्पण झाले, तर ते कधीही अस्थिर राहणार नाही. मी कोणीही नाही, हे सर्वस्व समर्थ चरणांवर वाहिलेले आहे अशी निष्काम भावना पाहिजे.

जीवात्मा जेव्हा शिवात्मा होतो त्यावेळेला तो निष्काम होतो. जीवात्मा दृश्य आहे तोपर्यंत सकाम वृत्ती आहे. जीवदशा म्हणजे एक लहर आहे. म्हणजेच मनाची ठेवण आहे. सकाम आशा समर्थ चरणांवर वाहिली कि ती शुद्ध होते. मग मन:स्वास्थ मिळते.

दर्शनात जाणीव रहीत होणे तेच परमसुख आहे. बाकीचे ते दुःख आहे. शरीर जर तुमचे नाही, तर बाकीचे काय तुमचे असणार? सुख पाहिजे असेल तर परम गतीत स्थिर होणे. सुख हे क्षणैक आहे.

कायम टिकणारे सुख

आपणाला कायम टिकणारे सुख पाहिजे आहे. मानव जन्म कशासाठी समर्थांनी बहाल केलेला आहे, तर आपण उत्तम तर्‍हेचा मार्ग आक्रमून आपणात असणारा अविनाशी कधी पाहता येईल, समर्थ दर्शन कधी घडेल यासाठी मानव जन्म आहे. जड म्हणजे दृश्य स्वरूपाच्या सार्थकासाठी प्रत्येकाने तळमळावयाचे आहे. आपण जडत्व व जडत्वाचा परिणाम मनावर धारण करीत असतो, पण जडत्वाच्या ठिकाणी आशक न राहता परम गतीत आपले मन स्थिर केले, तर मग आपली मनोभावना निष्काम होते. जडत्व असल्याशिवाय सताची जाण घेता येणार नाही, बैठक मारता येणार नाही, म्हणून जडत्वाची आवश्यकता आहे आणि ती राहणारच ! ©️

You cannot copy content of this page