Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मत जाना दे शरीर …©️

मत जाना दे शरीर …©️

श्री विठ्ठल – मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना? एका भक्ताने म्हटलेले आहे, “मन गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर || मी त्याचे शेले विणले ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची कारणे कोणती? मग आताच्या सेवेकऱ्यांची कामे करायला जड पडतील काय? संशय कल्पना यामुळे त्यांना शंका येते. जोपर्यंत संशय, कल्पना रहित होत नाही, तोपर्यंत भक्तीत रममाण होणे शक्य नाही.

सद्गुरुनी अखंड ठेव दिली. सर्वस्व दिले? पण शंका ती आली का? तर मन गढूळ झाले. मग सद्गुरूंपेक्षा आणखी कोणी तत्व जगात आहे का? तर नाही. मन सद्गुरु चरणात निमग्न करण्याचा प्रयत्न करा. तदनंतर आकारी आणि निराकारी कळेल.

सद्गुरु चरणात निमग्न झाल्यानंतर मग एकादशी याचा अर्थ कळणार नाही का? दहा इंद्रिये मनाच्या ठिकाणी लय करणे अन् ते मन सद्गुरू चरणावर वाहिल्यानंतर मग अकरावे ठिकाण वेगळे का आहे? हे सर्वस्व बहाल केल्यानंतर त्रिकुटी स्थिर होते. तिथून मन अकराव्यात लय होते. हिच ती एकादशी, मग एकादशीचा अर्थ कळेल की नाही? त्या एकाचाच अंत घेणे, त्याच्यानंतर एकादशी.

सेवेकऱ्यांना या आसनावरून गणित रूपाने सांगितले. म्हणून कृतिमान होण्याचा प्रयत्न सेवेकर्‍यांनी करणे. १ म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तोही एक लय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वी तलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण? कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page