Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

भक्ती कशासाठी? ©️

भक्ती कशासाठी? ©️

श्री समर्थ मालिक – आत्ताची जी भक्ती आहे ती कशासाठी? तर जो मानव करील, त्याच्याचसाठी ती आहे, अन् ती भक्ती त्याच्याच बरोबर असते. दोन्ही उभयता जरी असलात तरी नवऱ्याने केली ती बायकोला नाही अन् बायकोने केली ती नवऱ्याला नाही.

आता सांगा, या दरबारात एकाच घरात एकाच कुटुंबात किती सेवेकरी आहेत? त्यांचीच वळणे पहा. सताच्या वचनाप्रमाणे चालले आहेत का ते? आता तुम्ही तसेच घडविले तर सता प्रमाणे केले जाते.

या दरबारात काही एका तपाच्या, काही दोन तपाच्या ज्योती आहेत. काही अनेक तपाच्या होऊन गेल्या आहेत. त्या जर अशा करू लागल्या तर नवीन ज्योतींना कसे वळन द्याल? म्हणून मनाला वळण देण्यासाठी शुद्धीकरण करावे लागते. काही ज्योतींना अनुभव दिलेला आहे. काहीना द्यावयाचा आहे. येणारा काळ निराळा आहे. दरबारात येणारेच भक्त नाहीत. अनेक भक्त बाहेर सुद्धा विखुरले आहेत. ते मानव शुद्ध करण्याचा आराखडा चालला आहे. त्या आराखड्यातून एक म्हणा, दोन म्हणा तपाच्या ज्योतीनी सुधारावे हे संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page