सद्गुरू सांगतात वाम मार्गाने जाऊ नकोस. ते सेवेकरी ऐकत नाही. अविनाशी आत्मा काय करणार? तो स्व:मायेच्या कवचाच्या आंत दडला आहे. सेवेकरी काय करतो, हे सर्व त्याला माहित असते. सद्गुरू सांगतात ते थोडे तरी लक्षात ठेवले तरी फायदाच होईल. आपल्या ज्या इतर मायावी ज्योती बरबटलेल्या आहेत, ते काय करणार? जे आपले गुरु तेच शेवटपर्यंत पुरतील. आपले मायावी आईवडील शेवटपर्यंत (पुरणार) नाहीत. आपले सद्गुरू हेच सर्वस्व आहेत. तेच शेवटपर्यंत पुरतील. चूक झाली तर शेवटी सद्गुरूंना दया येते. सद्गुरू त्यांच्या हाकेला धावतात. मानव म्हणेल तो मरतो आहे, तर मरू द्या. मालिक तसे म्हणणार नाहीत. तो जरी चूकत असेल, तर सद्गुरू चूकू देत नाहीत. सांभाळून घेतात. थोडीशी शिक्षा देतात. ते कशाकरीता? तर, त्याला वळणावर आणण्यासाठी. सगेसोयरे फक्त पैशासाठी धडपडतात. सद्गुरूना एकच तहान असते, (सेवेकरी सन्मार्गाने जावा.)
सेवेकरी सत् मार्गाने नामस्मरण करील तेच सत् होते. सेवेकरी करोत न करोत सद्गुरू त्याला तारीतच असतात. ज्याला अविनाशी आत्मा म्हणतात, त्यांचा अंत घेणे सोपे आहे. मात्र घालून दिलेल्या वळणाने जावयास पाहिजे, म्हणजे ठाव मिळेल. अविनाशी आत्मा अनाठायी जाणार नाही. सद्गुरू प्रतच जाईल. (पुढे सुरु….३)©️