Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

बोलणे जास्त, पण कृती कमी कां? ©️

बोलणे जास्त, पण कृती कमी कां? ©️

श्री समर्थ मालिक – पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात बराच फरक आहे. त्या काळामध्ये जसा सेवेकरी बोलत होता, त्याप्रमाणे त्याचे कर्तव्य होत होते. त्याप्रमाणे ते वागत होते, पण आत्ताच्या सेवेकऱ्यांचे बोलणे जास्त, पण कृती कमी अशी तऱ्हा आहे. याचे कारण काय? हल्लीचा काळ, हवामान हे तशा तऱ्हेचे आहे, म्हणून प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात अंतर हे असे आहे म्हणून त्यांना घेता येत नाही. त्यांच्या मनाची भावना द्वैत असल्याकारणाने सेवेकरी कृतिमान होत नाही. होऊ शकत नाही. मनाची भावना चंचल झाल्याकारणाने कृतीही चंचल होते. त्यामुळे साध्य साधत नाही. तरी पण कुठेही लांब जाण्याची आवश्यकता नाही. अरण्यात जाऊन तप:श्चर्या करण्याची आवश्यकता नाही. योग साधनेची आवश्यकता नाही. साधीसुधी भक्ती करून मला डोळे भरून पाहणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. सरळ सत् शुध्द, साधी सोपी भक्ती करून मला पाहण्याचा प्रयत्न करा.

दुसरी गोष्ट, हल्लीचे दिवस फार कठीण आहेत. त्यामुळे सेवेकऱ्यांची मनें चलबिचल झाली आहेत. पर्जन्य पडत नाही, तरी त्याला त्या तऱ्हेचे संदेश आहेत. मानवी तऱ्हेने शासनाचे कर्तव्य अन आर्थिक बाबतीत मनें चलबिचल आहेत. त्याकडे लक्ष असल्यानंतर ध्यानधारणेसाठी थोडीशी बगल दिली जाते. एकचित्तता साधण्यासाठी त्याचे मन संशय रहित व्हायला पाहिजे, तेव्हाच एकचित्तता साधते. म्हणून एकचित्तता साधायची असेल तर मन कल्पना, संशय रहित करून मायेला थोडीशी बगल दिली पाहिजे. जडत्वाला विसरले पाहिजे. म्हणजेच एकचित्तता साधते. या ठिकाणी आसनाचे सानिध्यात काय चालते, हे सेवेकऱ्यांना माहित आहे. त्याचा त्यांना अनुभव आहे. या मार्गात गुंतला, या मार्गाने जाऊ लागला तेव्हाच ही गती माहीत होते. ©️

You cannot copy content of this page