Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

बोध – भाग दोन ©️

बोध – भाग दोन ©️

जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लीन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो, करतात ते मालिक करतात. मी निमित्त आहे. असे जेव्हा सेवेकरी म्हणेल, मग मात्र त्याला बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात (नामस्मरणात) जागृत राहणे, त्याचा उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो. प्रकृती जोपर्यंत अभिन्न होत नाही, तोपर्यंत मन अभिन्न होत नाही. मन जर भिन्न ठेवले, तर सर्वच भिन्न दिसेल. मनाला अभिन्न बनवा हेच संदेश आहेत.

सत भक्तीसाठी प्रकृतीमध्ये एवढे स्नेह आहेत, ते सत चरणात निमग्न होऊन ओलावले असतील, तर एकाच ठिकाणी स्थिर राहतात. मन अमृतमय झालेले असते. रसना, प्रेम जर अमृतमय झाले, मग मन कोठे जाईल? जी इंद्रिये आहेत, ती सद्गुरुमय झाल्यानंतर इकडे तिकडे होतील का?

भक्तिला प्रथम प्रेम पाहिजे. ते प्रेम शुद्ध असेल तर मन आकळता येते. स्नेह अमृत झाल्यानंतर……. मग तो पाझर फुटतो तो कोठे जातो? १७ वी जीवनकळा कोठून सुटते? सर्वस्व स्नेह ओलावले, तन्मयता साधली, पूर्ण निमग्न झाला कि नंतरच १७ वी जीवनकळा ‌ सुटल्यानंतर तो पाहू शकतो. त्या सुखासाठी, रसना ओलावली पाहिजे. मन शुद्ध झाले पाहिजे. पुढे सुरु…..२ ©️

You cannot copy content of this page