१) संगमेश्वर मुनी – अखंड दर्शन – आसनाची सेवा ही इच्छा. अनुग्रह झाल्यानंतर सर्वस्वाची जाणीव असताना देखील अहंपणा आला. मी कोणीतरी विशेष आहे असे वाटले म्हणून ही स्थिती झाली.
२) महामुनी सुनीस्क – प्रत्यक्ष सद्गुरु अनुग्रह देण्यास आले असताना उध्दटपणा झाला. तरी माऊली शांत होती. अनुग्रह दिला. अखंड नाम दिले. कांहीं काळानंतर प्रत्यक्ष उध्दटपणा झाला. त्याची ही शिक्षा आहे.
३) महामुनी संदोदरी – अनुग्रहापूर्वी कोणत्याही स्थितीची जाणीव नसताना, मंत्र तंत्राच्या सहाय्याने मानव ज्योतींना त्रास देण्याचे अघोरी कार्य हातून घडले. अनुग्रह झाल्यानंतर प्रत्यक्ष मालकांनी सांगितले, हे असत आहे. या मार्गाने जाऊ नकोस. परंतु, नंतर मी प्रत्यक्ष स्थूल देही ज्योतींची हत्या केली. त्यामुळे ही स्थिती प्राप्त झाली.
४) महामुनी नंदादीप – सताची जाणीव मिळत असताना, ऋध्दी सिद्धीच्या पाठीमागे लागलो. त्यामुळे हा त्रास !
५) मुनीवर्य जंबोधरी – अनुग्रह झाल्यानंतर प्रत्यक्ष मालकांनी सांगितले, तुला अखंड नाम दिले, दर्शन दिले, त्याप्रमाणे वाग, परंतु तिकडे लक्ष न देता, माझे तेच खरे, याप्रमाणे वागलो. प्रत्यक्ष मालकांचे आदेश धुडकावलेत. म्हणून ही स्थिती !
६) महामुनी रमाकांत – समर्थांचे आदेश सुटले असताना, शिस्तीचा भंग केला. जी शिस्त समर्थ गादीजवळ असावयास पाहिजे, ती ठेवली गेली नाही. म्हणून ही स्थिती !
७) मुनीवर्य नंदिकेश्वर – सद्गुरु आसनाजवळ असताना, त्यांनी घालून दिलेली वळणे, आदेश त्याप्रमाणे वागलो नाही. उद्दटपणाने वागलो. त्यामुळे ही स्थिती !
८) महामुनी विलाक्ष – वादविवाद करीत असता, उध्दटपणा झाला, त्यामुळे ही शिक्षा !
९) महामुनी चक्रवर्ती – मालकांचे सांगणे ऐकले नाही. माझ्या मनानेच मी केले. त्याबद्दल ही शिक्षा.
१०) महामुनी ऋषीकेश्वर – मालकांचे आदेश, संदेश न मानता, माझे तेच खरे असे वागलो. त्यामुळे ही स्थिती !©️