श्री समर्थ मालिक – मोहाला बळी पडणाऱ्या ज्योती पुष्कळ आहेत. सत्यासाठी जगणाऱ्या ज्योती व्यासपीठावर अजून उभ्या राहिल्या नाहीत. त्यांना कोणी पुढे येऊ देत नाही. याला कारण अघोर आहेत. ज्योत अघोरांच्या ओंजळीने पाणी पीत आहे. होते ते चांगल्यासाठी होते. आपल्या आदेशाप्रमाणे हिला संरक्षण दिले होते. या पदावर आलेल्या ज्योती यातच गुरफटून जातात. त्यांना मोह निर्माण होतो.
उ:षापाचा काळ अगदी जवळ आला आहे. जो करतो ते माझे पुण्यफळ आहे म्हणून करीत नाही. तो जनतेच्या हितासाठी करावे ते त्याला कळले नाही. कळेल केव्हा? त्याच्या मस्तकाचे दोन भाग होतील तेव्हा ! बाकी बोलण्याची आवश्यकता नाही. होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे.
भारतीयांची बुद्धी सुद्धा मायेत गुरुफटली आहे. सगळ्यांना पैसा प्यार आहे. पैशाला जो बळी पडला, त्यांना गरिबाची किंमत काय कळणार आहे? गरिबाला तो काय विचारणार आहे? प्रत्येकाची भावना आहे की मी राजा व्हावे. राजा होण्याची इच्छा बलवत्तर आहे. पण राज्य कसे करावे हे समजत नाही. कारभार कसा चालवावा याचे ज्ञान नाही. परिस्थिती कोणत्या तऱ्हेने चालली आहे? आदीअंतापासून सर्वच काही सताचे भक्त आहेत असे नाही. सताचे भक्त कधीही वाया जाणार नाहीत. पण मायेचे भक्त त्यांना अशी मनोभावना होते की तेच सर्वस्वाचे निधान आहे. आपल्यापुढे कोण जाणार आहे? ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र यांनी ते परिपूर्ण असल्यामुळे ते उन्मत्त होतात. सताचे कर्तव्य धीर गंभीर आणि शांततेचे असते. त्या ठिकाणी माया ही आडवी येते. तिचे काही चालत नाही. ©️
