श्री विठ्ठल – नैतिक सत्य म्हणजे ते सतच आहे. सताला नैतिकही नाही आणि भौतिकही नाही. ते पूर्ण सत आहे. त्याला शुद्ध ही सारखे आणि अशुद्धही सारखेच आहे. चांगले वाईट त्याला सगळे समान आहे, असे ते सत्य आहे. नैतिक जे आहे ते आकारी आहे, म्हणजेच प्रकृती अंगाने ते नटलेले आहे. आपली नीतिमत्ता सांभाळून, सताचे पाठीमागे लागणारा मानव, एकाच खांबावर उभा राहिला, इकडे तिकडे न ढकलता वाटचाल करणारा मानव, त्यालाच नैतिक सत्य म्हणतात. मानव सताची खूण माहीत असताना सुद्धा इकडे तिकडे भटकतो.
चमत्कार, नमस्कार पहाणारा मानव आणखीन कुठे काय आहे, कोणत्या ठिकाणी चमत्कार आहेत, त्याला भाळणारा मानव असेल, तर त्याला भौतिक सत्य म्हणतात.
नैतिक सत्य जे आहे ते या अशा चमत्काराला बळी पडणार नाही. भौतिकच्या ठिकाणी काय दिसते, तर चमत्कार! त्याला भाळून मानव त्या ठिकाणी रमला जातो, पण त्याला स्वतःचा अंत नाही. त्याला भौतिक सत्य म्हणतात. जे सत्य आहे ते सार्वभौम आहे. कुठेही ठाव मोकळा मिळणार नाही. पूर्णात पूर्ण असे ते सत आहे. त्याचा अंतपार नाही. त्याचे वर्णन करता येणार नाही. ते सर्व ठिकाणी व्यापक आहे. सार्वभौम आहे. त्याच्यापासूनच भौतिक सत्याची निर्मिती होते. सताची जाणीव असल्याशिवाय, भौतिक सत्य हे पहाता येणार नाही. भौतिक सत्याची निर्मिती केली कोणी? नैतिक सत्य नाही, अखंड सत्य नाही तर भौतिक निर्माण होईल का? आकार सत नसेल तर? (पुढे सुरु..२)©️