निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती वस्तू साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही. प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो, त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो, महान पर्वत, काटे कुटे, जंगल झाडी, अशा मार्गातून प्रवेश करी निघाला तरी त्याला त्याचे दुःख वाटत नाही. कारण त्याला महान वस्तू प्राप्त करून घ्यावयाची असते. काही झाले तरी तो आपला मार्ग विसरत नाही. तदनंतर त्याला ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर, समाधान वाटते. मग म्हणतो मी प्राप्त करून घेतली की नाही? अशी त्याला ग ची पीडा होते. अहंकार निर्माण होतो.
त्याप्रमाणे सत् भक्तीसाठी आपण त्या भक्तीच्या अनुसंधनाने मिळालेला सत् भक्तीचा प्रकाश, ती योगीयाची खूण योगीच जाणतो. सत् भक्तीच्या मार्गाने जाऊ लागला, त्याला त्याचा अनुभव येऊ लागला, अनुभव घेऊन तृप्त झाला, मग तो त्या मार्गाने जाण्याचा स्वीकार करतो. पुढे पुढे गेल्यानंतर अडीअडचणी निर्माण होतात. त्रास होतो. त्रास वाटू लागल्यानंतर अनुभव जरी असला तरी त्याचा विसर पडून मग सोडतो का तो?
पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जी ज्योत प्रथम सत् भक्तीने जाण्याचा किंवा मार्ग आक्रमण करण्याचा अनुभव घेते, त्याला पुढे त्रास जरी झाला तरी पूर्वीच्या अनुभवामुळे सत् भक्तीच्या प्रकाशाला ती विसरत नाही. कारण जे पाहिले नाही ते त्याला पहावयास मिळते.
सत् भक्तीच्या प्रकाशात तो डुंबत असतो. त्याचा निश्चय ठाम असतो. त्याच्या निश्चयाच्या बळाचे वर्णन इतर मानवांना करता येणार नाही. इतर मानवांना त्याची भक्ती आजमावता येणार नाही. (पुढे सुरु…२)©️