श्री समर्थ अलक – त्रिगुणांवर पृथ्वीची उत्पत्ती आहे. त्रिगुण हे एक वर्तुळ आहे. त्यांची तीन द्वारे – प्रवेशद्वार, मध्यद्वार आणि अंत्यद्वार ! अशी तीन द्वारे त्यात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन भावना, त्यात तीन अंकुर ! वर्तुळद्वार ही टोके, यातूनच सर्वस्व निर्माण झाले. त्याच्याही निराळे एक बीज, ते त्रिगुणात गुरफटले नाही अन गुरफटणार पण नाही. हे जे तीन अंकुर, त्यांची तीन द्वारे, ती टोके यांचे कितीही दडपण आले तरी ते गुरफटणार नाही. ते निराळे आहे. वेगळे आहे. यांनी गुरफटविण्याचा प्रयत्न केला होता. जो मध्य अंकुर त्यात पण गुरफटले नाहीत. उलट त्यालाच गुरफटून टाकले. अशी ही दोन टोके आहेत. त्यात एकच टोक स्थिर म्हणून जवळ. दोन अलग झालेली आहेत. पण अलग होऊ देणार नाहीत. परंतु कर्तव्यामुळे दूर ठेवलेली आहेत. त्यांना अहंकार झालेला आहे. येथून पुढे आपलेच कर्तव्य करणार. त्रिगुणावर सर्वस्व कारभार सोपविला होता. आता हे स्पष्टपणे दूर केले आहे. आता त्यांनी, आम्ही करणार तेच मुख्य, असे मानावयाचे नाही. त्यांनी कर्तव्य करावयाची जबाबदारी घ्यायची नाही. दुसरे जे संघर्षण चालू आहे; सूक्ष्माप्रमाणे स्थूलाचीही चाळण मारली जाणार आहे. याचे संदेश दिले होते पण ते स्थगित केले होते. पण संदेश देण्यास हरकत नाही. निसर्ग तऱ्हेने म्हणा संदेश जरूर अमलात येतील. तेव्हा कोणती घटना घडेल ते आज मी सांगणार नाही. पण घडण ही घडणारच! ©️
श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …
