Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामाचा महिमा-श्री समर्थ मालिक©️

नामाचा महिमा-श्री समर्थ मालिक©️

नामाचा महिमा – या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टनातून पलीकडे जावयाचे आहे, ज्याला मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्याने ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने, ध्यासाने सद्गुरु दर्शन, सद्गुरूंचा ठाव मिळतो. त्याला कोणत्याही तऱ्हेची भीती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे. नाम मिळाल्यानंतर त्याला वेळ काळाचे अगर ठिकाणाचे बंधन नाही, असे हे एकच श्रेष्ठ नाम आहे. नामाने जाणारे केव्हाही तरुनच निघतात. नाम हे तारक आहे. मानव रूपी नौका तरुण जाण्याला नाम हे एकच साधन आहे. त्या नामरूपी नौकेच्या सहाय्याने मायारूपी नदी तरुन तो पैलतीराला जातो. पैलतीराला गेल्यानंतर सद्गुरुला डोळेभरुन पाहतो. सर्वस्व सार्थक या नामातच आहे, याच्या निराळे काही नाही.

षडांग – अखंड दर्शनाची इच्छा याशिवाय निराळे नाही. आमच्यासारखे अभागी कोण आहेत? मातृभूमीच्या शुद्धीकरणाच्या कार्यास हातभार लावावा ही इच्छा आहे. मानवांच्या उद्धाराकरिता अवतार निर्माण होऊन दर्शन नाही याचा खेद झाला. हा आम्हा मानवांचा हक्क आहे. जप तप, व्रत-वैकल्ये, स्थूल सूक्ष्म, कारण, महाकारण. मानव कोणत्याही अवस्थेत असो किंवा कोणती ही स्थिती असली तरी त्याची एकच इच्छा आहे ती म्हणजे अखंड दर्शन. अखंड दर्शन मिळाले म्हणजे सर्वस्वातून मुक्त होतो. अखंड मागणीचा अखंड झरा निर्माण झाल्यानंतर काय शिल्लक राहते? हा झरा मिळाल्यानंतर त्याचा पाझर कोणीही आटवू शकणार नाही. सर्व काही मानवाला मिळाले तरी ते अशाश्वत आहे. जे मिळते ते क्षणभंगुर आहे. जे शाश्वत आहे ते मिळण्यासाठी आज पर्यंत धडपड केली ती सफल झाली. आणखी कोणतीही इच्छा नाही. आपल्या कृपाप्रसादाने पूर्ण मोकळीक झाली आहे. आपल्या आदेशाप्रमाणे वागण्याची प्रबळ इच्छा आहे.

आम्हासाठी दयाघनाने किती त्रास सोसला. कार्य करणारे फार निराळे आहेत. आम्ही कार्य करणारे कोण? करणारे असतो तर अशा तर्‍हेने का राहिलो असतो? एकच इच्छा – प्रत्येक दरबारामध्ये एक क्षण का होईना दर्शन मिळावे ही इच्छा आहे. ©️

You cannot copy content of this page