श्री समर्थ मालिक – सेवेकर्यावर अवकृपा केली तर तो नामशेष होतो. मुख्य मुद्दा त्याला मार्गावर आणण्यासाठी थोडेसे करावे लागते. संचिताचा जो भाग, जे भोगायचे ते भोगलेच पाहिजे. ते कोणालाही सुटणार नाही. एवढे सत्य आहे, की तो भोग सेवेकऱ्याला तितकासा तापदायक होऊ देत नाहीत.
सेवेकऱ्याची मनोकामना अशी असते की सद्गुरु सेवेकरी आहे, मग मला हा त्रास का? परंतु सेवेकऱ्याचे जे पूर्वजन्मीचे देणे घेणे, ते फेडल्याशिवाय तो मोकळा होत नाही. सत सेवेकरी व्हावयाचे असेल, तर पूर्वजन्मीचे देणे घेणे सर्वस्व द्यावयास पाहिजे.
कितीही संकटे आली तरी सद्गुरु, सेवेकर्याचा थोडासा भाग आपल्या शिरावर घेतात. सेवेकऱ्याला जाणीव होण्यासाठी थोडासा त्रास होतो. मानवाला संदेश दिलेले आहेत. तुझी सर्वस्व कर्तव्य पूर्ण कर अन जो वेळ मिळेल तो सत्कारणी लाव. सर्वांनाच मायेचे वेष्टन आहे. ते कोणालाही सुटलेले नाही.
अखंड नामस्मरणात सतत असेल तर प्रारब्धाचा क्षय होतो. नामस्मरण करण्यासाठी बैठकच मारावयास नको. सहज ध्यान केले तरी चालते. संकटात नामस्मरण फार फार करायचे असेल, तर सुरुवात तरी थोडेसे कर हे संदेश आहेत.
सेवेकऱ्याला त्याचप्रमाणे प्रकाशमान सेवेकऱ्याला सर्व करायला वेळ असतो, पण दोन अक्षरी नाम घेण्यास वेळ नाही. त्याला काही नको, फक्त मनाची शुद्धता पाहिजे. सत शुद्ध गतीने मनात अभिलाषा न धरता, जाता येता नाम घेतले तरी पुष्कळ आहे. गंध नको, फुले नको, अक्षता नको काही नको. अगदीच वेळ नसला तर संध्याकाळी थोडे तरी कर. मंत्र तंत्र काही नको. फक्त दोनच अक्षरे! माळ जपण्याची जरुरी नाही. झाले किती याचेही माप नको. करायचे ते शुद्ध गतीने कर. मी त्याची नोंद घेत असतो. एकच संदेश, कितीही दूखत असले, तरी मुखातून सारखे नामस्मरण घेण्यास काही हरकत नाही. ©️
