Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

मालिक एकचित्त – नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! काही एक नव्हते, असे काही मानवांचे म्हणणे आहे. पाचही तत्वे नव्हती, मग यांचा कर्ता कोठे होता? ते ब्रह्म कोठे राहिले होते? मी मागेच सांगितले आहे. मला कर्ता करविता कोणीही नाही. मी अखंड आहे. मला नाही आई बाप. मी स्वयमेव आहे. याची गती मानवाला नाही.

पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना झाल्यानंतर, मानवांची उत्पत्ती केली. प्रकृतीच्या अनुसंधनाने मानवा मानवात वितंडवाद निर्माण होतो. पण, सत् कोठे आहे? कसे आहे? कोणीही पाहिलेले नाही. मी सर्वभूतेषु पश्य आहे. ही गती त्यांना नाही. पण अमुकच हे आहे असे कोणी दाखविलेले नाही. म्हणून प्रकृतीचा भांड निर्माण होतो. त्यामुळे भेदाभेद निर्माण झाले. जो तो आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. आपले सर्वस्व स्थापण्याचा प्रयत्न करतात. मानव मनाच्या आधीन गेला तर मन बुध्दीच्या चाकोरीने जाते. मी जर अभिन्न आहे, तर मानवाने माझी ओळख का करून घेऊ नये? मी अभिन्न आहे, हे जर कळले असले, तर तो फसणार नाही. पण प्रकृतींच्या चाळ्यांमुळे तो फसतो.

मानवानीच जातीवर्ण निर्माण केलेत, धर्माच्या शाखा निर्माण केल्यात, हे मी सांगितले आहे. मानवाने जर सत् भक्तिची गती घेतली तर, जातीयवाद निर्माण होईल का? या चाकोरीने गेला तर त्याला सर्वस्व एकच दिसेल. सर्व संतांनी सांगितले आहे, त्यांनी गती घेतली, त्यांना एकच तत्व दिसत होते. त्यांनी सांगितले त्यात काही वावगे नाही. पण हल्लीचा मानव अहंकाराने बरबटलेला आहे. अशा मानवामुळे भक्तीचे लोण वाढत नाही. सत भक्तीने जाणारा जगात कोणी नाही, फार विरळा आहे.©️ पुढे सुरु….२

You cannot copy content of this page