Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नळी फुंकीली…©️

नळी फुंकीली…©️

श्री समर्थ मालिक –तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || ज्या वेळेला तुकोबांनी हे बोल फेकले त्या वेळेला त्यांनी किती तीर्थे केली होती? काशी, गया, प्रयाग वगैरे त्यांनी तीर्थे केली होती का? मग तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || आधीच मन मुंडा | मगच ब्रह्म धुंडा || ज्याने मन मुंडा केले नाही, त्याला ब्रह्म कळेल का? कोणत्या सेवेकऱ्यांने मन मुंडा केले आहे?

तुकोबांनी एकाच ठिकाणी ब्रह्म पाहिले. डोळस झाल्यानंतर त्यांना तीर्थ कोठे आहे ते कळले. मानव हा सगुणी आहे. सत शुद्ध अंत:करणाने सद्गुरू चरणात निमग्न झाला मग परमेश्वर दूर आहे का? सर्व तीर्थे जर सद्गुरूंच्या ठिकाणी आहेत मग सद्गुरुंनी जे संदेश सोडले त्याप्रमाणे तुम्ही वागता का?

प्रवचन मी सांगतो आणि तुम्ही “नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे”. त्याची जोपासना कोणी मीच करावयाची कां? तुकोबाने जे सांगितले ते कोणत्या तीर्थाच्या ठिकाणी ते गेले होते? तुकोबा असेच होते का? पण तुकोबांची काही लोकांनी वेड्यात गणना केली होती. पण त्यांचे प्रणव, बोल, विचार कसे होते? मग तुम्ही ज्यांना शरण आहात, त्यांच्या प्रणवाप्रमाणे, आदेशाप्रमाणे तुम्ही चालता का? मानवी तऱ्हेने त्यांनी जे प्रणव सांगितले, त्याची तरी गुप्तता तुम्ही ठेवली आहे का? एकाने स्पष्टीकरण करावयाचे, एकाने ठाम विचारावयाचे. ©️

You cannot copy content of this page