आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत. पण प्रत्यक्षात या दरबार मध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या महान महान चुका होत आहेत. पण कुणाला फेकले आहे काय? टाकले आहे काय?
अखंड तत्व अखंड आहे. दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे. सेवेकरी म्हणतो, मी कर्तव्य करीत आहे, पण या मानवाची कृती केव्हा ना केव्हा तरी बाहेर पडणार आहे. आपल्या कर्तव्यात राहणे. दयाघन माऊली आहे. तुम्ही मानव काय करू शकता? काळ समिप आलेला आहे. सेवेकर्यांनी कर्तव्यात राहणे. त्राही त्राही होण्याची वेळ आलेली आहे. हे संदेश सेवेकर्यांना आहेत. लपवाछपवी, दडवा दडवी करू नये. ते तुमचे जर आहे, जे सर्वस्व तुम्ही टाकले आहे, तर का निवेदन देऊ नये? कुठली ज्योत जर चुकली असेल तर निवेदन का देऊ नये? सेवेकर्याच्या मस्तकावर हात टाकल्यानंतर सेवेकरी कुठे गेला होता?
जप तप करावयास सद्गुरु ध्यान, सद्गुरु नाम यापरते अधिक काही नाही असे का सांगितले आहे? हेच ते ज्ञान ! त्यांच्या कृतीप्रमाणे घडत आहे. घडून गेले आहे. ते आता दिसत आहे. नाराजी कोणी पत्करायची नाही. (समाप्त) ©️
